०६ एप्रिल २००९

येईन मी तेव्हा

तुला भेटण्याची नाही मला अजुन घाई
जोवरी न आज्ञा देवा तुझी मला येई

तुवां धाडिले मज येथे गुंतवुनी नाती
मनामधी भरूनि सारे मोह, क्रोध, प्रीति

तोडु कशी नाती ? सोडू कसे सर्व कांही?
जोवरी न आज्ञा देवा तशी तुझी होई

करी नेटका वेव्हार समजविले होते
गणित निवासाचे माझ्या ठरवियले होते

तुझ्या हिशेबाची जेव्हा जमा-वजा होई
येईन मी तेव्हा देवा तिथे तुझ्या पायी

२ टिप्पण्या:

  1. सिद्धीदादा,
    आता खात्री पटली ना की तुम्हा मुलांना सोडून मी जाऊ शकत नाही आणि जाऊ इच्छीतही नाही त्याची?

    उत्तर द्याहटवा