तुला भेटण्याची नाही मला अजुन घाई
जोवरी न आज्ञा देवा तुझी मला येई
तुवां धाडिले मज येथे गुंतवुनी नाती
मनामधी भरूनि सारे मोह, क्रोध, प्रीति
तोडु कशी नाती ? सोडू कसे सर्व कांही?
जोवरी न आज्ञा देवा तशी तुझी होई
करी नेटका वेव्हार समजविले होते
गणित निवासाचे माझ्या ठरवियले होते
तुझ्या हिशेबाची जेव्हा जमा-वजा होई
येईन मी तेव्हा देवा तिथे तुझ्या पायी
०६ एप्रिल २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
baba zabardasta.
उत्तर द्याहटवाDolyat paani Anlet.
सिद्धीदादा,
उत्तर द्याहटवाआता खात्री पटली ना की तुम्हा मुलांना सोडून मी जाऊ शकत नाही आणि जाऊ इच्छीतही नाही त्याची?