05 January 2011

उठा उठा बंटिबाबा

कोंबड्यानं दिली कुकुच्कू बांग
उंदरानं टाकली सायकलवर टांग

बाजारात गेला आणायला खाऊ
तर आलि आडवी पोलीस माऊ

पोलिसमाऊनं वाजवली शिटी
भूभू लागला माऊच्याच पाठी

माऊची उडली तारांबळ
उंदराला चढलं हत्तीचं बळ

उंदीरमामाला मिळालि सूट
स्वतासाठी घेतले बाटाचे बूट

मामीसाठी पुरण पोळ्या
पिलांसाठी चॉकलेट, गोळ्या

वजनदार वस्तूनी भरलं दप्तर
सायकलचं चाक मग झालं पंक्चर

उठा उठा बंटिबाबा जागे व्हा
कुर्रकुर्र दात घासुन तोंड धुवा

जाऊ द्या तो उंदीर जाऊ द्या ती माऊ
आपण आपले तोंड धुवुन ब्रेकफास्ट खाऊ

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा