मंडळी, दुबईला आल्यापासून बनुताईंनी स्वत:ला सगळ्या फूड आउट्लेट्सना भेटी देणे, डेझर्ट सफारी, मेट्रोतून प्रवास, मित्रमैत्रिणींची नवीन गँग जमवणे, प्लेग्राउंड्स, थिएटर्स, पार्क्स, शॉपिंग मॉल्सच्या फेर्या, आइस्क्रीम, चॉकलेटस् वगैरेंमधे गुंतवून ठेवलंय. नंतर मग शाळेत अॅडमिशन वगैरे कार्यक्रम आहेतच. त्यामुळे आता कवितांमधे यायला त्याना वेळ नाही मिळणार म्हणतात. "अधीमधीकधीतरी येईन म्हणावे" असा निरोप द्यायला सांगितलंय त्यानी. आणि तुम्हाला रेग्युलरली भेटायची जबाबदारी त्यानी आता 'बंटीबाबा' वर सोपवलीय. बंटी आठवतोय ना तुम्हाला? बनुताईंनी आईकडे खास मागणी केलेला भाऊ? तो आला परवा १४ डिसेंबरला.
थँक्स, सोड हात आता पलिकडे जातो
आतून दिस्ली आई तिला बाहेरून पहातो.
कोण रे या बाय्का आता बाहेर मला नेतायत?
तुझ्या हातामधुन हात माझा सोडवून घेतायत?
हस्तायत सग्ळया, तिकडं आई घामाने निथळते
पण खरं सांगू? अरे, तुझ्याऽऽ पेक्षाऽऽ छाऽऽन दिस्ते !!
येरे तुही थोडा इथे, आईला माझ्या भेट
घाम तिचा पूस आणि मगच जा तू थेट
नाहि नाही गरज माझी ओळख करुन द्याय्ची
बाहेर आलो तेव्हाच हाक ऐकू आली तिची
'ते कोण?' काय विचारतोस? अरे, बाबा माझे ते
रोज नाई का माझ्याशी बोबडे बोलाय्चे?
आईला रोज समजावाय्चे धीर देत देत
आता बघ अवतार ! स्वता तेच गोंधळलेत
आणि माणसाला एका मिठी मारून रडतायत
स्वत: बाबा आहेत तरी त्याला 'बाबा' म्हण्तायत
बाबा का रे बाबांचे ते? बरे वाट्तायत नई?
बघूऽऽ आता लाड माझे पुरवतायत की नाही.
ओके, ओके, नीघ आता, आय नो यू आर बिझी
पण विसरू नकोस मला...मीही ठेविन आठवण तुझी
१७ डिसेंबर २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा